पंढरीची श्री. विठ्ठल दर्शन वारी हे एक महाराष्ट्राच्या धार्मिक सांस्कृतिक जीवनाचं वैशिष्टयपूर्ण वेगळेपण आहे. अडचणी, अव्यवस्थाची पर्वा वारकरी करीत नाही. पण त्या अडचणी असतातच! पायी चालण्याच्या शारीरिक अडचणी, व्याधी तर खूप असतात. हा प्रवास निर्वेध होण्याच्यदृष्टीने शारिरीक प्रथमोपचाराची सोय असणं आवश्यक आहे असं जाणवत. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी "रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा" समजून पंढरपूरला जाणा-या भाविकांसाठी विवेकानंद रुग्णालयाच्या वतीने मोफत फिरते रुग्णसेवा केंद्र (अँम्बुलन्स ) वारक-याच्या सेवेसाठी दि. ०३ जुले २०११ सायं ६ वाजता रवाना झाले. यामध्ये दोन वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश वळसंगकर व डॉ. राहुल कुलकर्णी, परिचारक श्री. नवनाथ दंडीमे, श्री. सहदेव गावकरे व श्री. सोपानराव गवंडगावे यांच्यासोबत चालक श्री. राजकुमार ठाकूर हे सर्वजण दररोज किमान १००० रुग्णांना पुरतील एवढी ओषधी साहित्य घेवून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. या पथकाचे नेतृत्व श्री. सोमनाथ बालवाड करत आहेत.

विवेकानंद रुग्णालयाच्या डॉ. महेश देवधर, श्री. अनिल अंधोरीकर यांच्या दूरदृष्टीतून व डॉ. कुकडे काका व डॉ. भराडिया यांच्या प्रेरणेने व संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीपराव देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात येणारी हि रुग्णसेवा आषाढी एकादशीपर्यंत राहणार आहे.

दि. ०३ जुले २०११ सायं ६ वाजता वरील पथकाला विवेकानंद रूग्णालयामध्ये शुभेछा देण्यासाठी डॉ. दिलीपराव देशपांडे, श्री. अनिल अंधोरीकर, डॉ. सौ. अरुणा देवधर, डॉ. राधेश्याम कुलकर्णी, डॉ. अभय ढगे, डॉ. सौ. ज्योत्स्ना कुकडे, डॉ. गोपीकिशनजी भराडिया श्री. विनोद खरे, श्री. महेश अंबुलगे, श्री. राजकुमार डांगे, श्री. अनिल जवळगेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 

पंढरीच्या वारीत विवेकानंद रुग्णालयाचा सहभाग

 

छायाचित्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.